रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून, सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ADIP योजनेंतर्गत दिव्यांगांना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, स्मार्ट फोन इत्यादी साहित्य मिळू शकेल, तर वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, कुबड्या, चष्मा, श्रवणयंत्र, गुडघा बेल्ट, दाताची कवळी इत्यादी साहित्य मिळू शकेल.

ADIP योजनेसाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, शिक्षण पुरावा (अंध असल्यास) आणि फोटो आवश्यक आहेत, तर वयोश्री योजनेसाठी आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि फोटो आवश्यक आहेत.

शिबिराचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

• रत्नागिरी: 24/02/2025
• राजापूर: 25/02/2025
• लांजा: 27/02/2025
• संगमेश्वरः 28/02/2025
• चिपळूण: 01/03/2025

जिल्हा प्रशासनाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना या तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.