नवभारत छात्रालयतर्फे गिम्हवणे येथे रोपांचे मोफत वाटप

दापोली – कुणबी सेवा संघाचा नवभारत छात्रालय परिवार आणि कृषि महाविद्यालयाचा विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील दुबळेवाडी येथे विविध प्रकारच्या रोपांचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी साग, काळमिरी रोपे आणि चिकू कलमे यांच्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यासाठी तसेच नवभारत छात्रालय परीवारातर्फे यांनी ४२० साग रोपे, आणि ६० चिकू कलमे तर मे अश्विनी अॅग्रो फार्म यांचेमार्फत २४० काळीमिरी रोपे उपलब्ध करून दिली.

“शेतकऱ्यांनी या रोपांची लागवड करून त्याची चांगली जोपासना करावी आणि आपल्या पुढील पिढीसाठी चांगल्या प्रकारे गुंतवणूक करावी असे आवाहन कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे यांनी यावेळी उपस्थित प्रा शेतकऱ्यांना केले. तसेच फक्त आंबा, काजू, नारळ व सुपारी यांची लागवड न करता कोकणातील कोकम, रींगी आणि फणस या सारख्या दुर्लक्षित फळाची देखील शेतकयांनी लागवड करावी या रोपांच्या उत्पन्नापासून निश्चितच शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारेल” असेही ते या वेळी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत, कुणबी सेवा संघाचे उपाध्यक्ष,विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. गोविंद जोशी, गिम्हवणे ग्रामपंचायत सदस्य दुबळेवाडीचे सेक्रेटरी शैलेश खळे, कुणबी सेवा संघाचे सेक्रेटरी हरीश्चंद्र कोकमकर, विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. डॉ. आशिष शिगवण, वरीष्ठ संशोधन सहाय्यक प्रा.डॉ. प्रवीण झगडे, तसेच सुधीर दुबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विस्तार शिक्षण विभागातील वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकन्यांना एकूण प्रत्येकी १२ झाडे या प्रमाणे एकूण ७२० रोपा / कलमाचे करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला विस्तार शिक्षण विभागातील वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक सौ. शिल्पा नाईक, कृषि सहाय्यक श्री. नरेश आईनकर,समीर उसरे, दृकश्राव्य चालक श्रीयश पवार व वाहन चालक तालोट आणि वैभव साळुंखे यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यास सहकार्य केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*