दापोलीमध्ये हाडांची मोफत चाचणी, नक्की लाभ घ्या

दापोली : दापोलीतील मेहता हॉस्पिटल आणि दशानेमा गुजराती युवक संघटनेच्या माध्यमातून ‘बोन मिनरल डेन्सिटी’च्या म्हणजेच हाडांच्या मोफत चाचणी शिबिराचं 9 फेब्रुवारी व 16 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आलं आहे.

तुम्हाला जर कंबर दुखी सांधेदुखी किंवा अंग दुखी आहे तर या शिबिराचा नक्की लाभ घ्या, असं आवाहन दापोलीतील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. कुणाल मेहता यांनी केलंं आहे.

डॉ. कुणाल मेहता

सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत या शिबिराची वेळ राहणार आहे. दापोली शहरातील मेहता हॉस्पिटलमध्येच तुम्हाला मोफत बीएमडी चाचणी करून घेता येणार आहे. बीएमडी म्हणजे हाडांची घनता आणि कॅल्शियमचं प्रमाण जाणून घेण्याची चाचणी होय.

ही चाचणी कोणी करावी?

ज्यांचं वय 40 पेक्षा अधिक आहे असे पुरुष, बैठी जीवनशैली असणारी व्यक्ती, या स्त्रियांचे वय 35 पेक्षा अधिक आहे किंवा दीर्घकालीन सांधेदुखी व अंगदुखी असणारे रुग्ण.

दापोलीकरांनी या चाचणी शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असं आवाहन डॉ. कुणाल मेहता यांनी केलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*