राज्यात आणखी चार ‘ओमीक्रॉन’ बाधित आढळले ; आतापर्यंत ३२ जणांना संसर्ग!

मुंबई:- “जानेवारीत ओमीक्रोनचा संसर्ग राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना झालेला आढळेल ” आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात आज आणखी चार ‘ओमीक्रॉन’बाधित आढळले आहेत. या चार ‘ओमीक्रॉन’बाधित रुग्णांमध्ये उस्मानाबादमधील दोन जण, मुंबईमध्ये एक आणि बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमीक्रॉनबाधितांची संख्या आता ३२ वर पोहचली आहे. आज आढळलेल्या चार रुग्णांमध्ये तीन पुरूष व एक महिला आहे.

आजपर्यंत आढळलेल्या ३२ ओमीक्रॉनबाधितांमध्ये मुंबई-१३, पिंपरी चिंचवड-१०, पुणे – २, उस्मानाबाद -२, कल्याण डोंबिवली -१, नागपूर-१, लातूर-१,वसई विरार -१ आणि बुलडाणा -१ अशी रूग्ण संख्या आहे. यापैकी २५ जणांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून सुट्टी देखील देण्यात आलेली आहे.

तर, राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट जरी ओसरल्यात जमा असली, तरी देखील आता ओमीक्रॉनरुपी नवं संकट येऊ पाहत आहे. कारण, आता जानेवारी महिन्यात मोठ्याप्रमाणावर लोकांना ओमीक्रॉनचा संसर्ग झालेला आढळेल, अशी माहिती राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*