पणदेरी धरण प्रकल्पास गळती बाबत प्रशासनास दिल्या सुचना.

मंडणगड:- मध्यम स्वरुपात बसत असलेल्या तालुक्यातील पणदेरी येथे माती धरणाचे यंदाचे बांधकाम हंगामात धरणाचे मजबूतीकरणाचे काम होऊवूनही गळती लागल्याने व गेल्या आठ दिवसांपासून पावसाने तालुक्यात दडी मारलेली असतानाही गळती लागलेली असल्याने पंदेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. प्रशासनास या संदर्भात माहीती मिळताच खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने गळती थांबवण्यासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. गळतीमुळे जीवतहानी होऊ नये याकरिता पणदेरी बौध्दवाडी येथील ४० घरातील १७५ ग्रामस्थांचे पंणदेरी रोहीदास वाडी व कोंडगाव येथील काही ग्रामस्थ अशा एकुण २०० ग्रामस्थांचे पंणदेरी जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्थलांतर करण्यात आले आहे.या पंदेरी धरणास गळती सुर झाल्याचे वृत्त समजताच सन्मानिय मा.आमदार श्री.संजय कदम यांनी तातडीने पंदेरी धरण येथे भेट दिली.यावेळी त्यांनी प्रशासनास योग्य सुचना केल्या.यावेळी उपस्थित अधिकारी रत्नागिरी पाटबंधारे रत्नागिरी विभागाचे अधिक्षक अभियंता वैशाली नाडकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.धरणाची गळती थांबवण्याकरिता कोणती कार्यवाही करावी लागेल ती युध्दपातळीवर करावी अश्या सुचना त्यांनी यावेळी अधिकारी यांना केल्या.यावेळी घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेले रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्री.मोहितकुमार गर्ग व सन्मानिय माजी आमदार संजय कदम या दोघांमध्ये पंदेरी धरणाच्या उपस्थित झालेल्या समस्सेसंदर्भात चर्चा झाली.

यावेळी मंडणगड तालुकाध्यक्ष श्री.मुजफर मुकादम,माजी सभापती भाई पोष्टरे,ओबीसी सेलचे सचिव श्री.प्रकाश शिगवण,जिल्हा परिषद सदस्य श्री.संतोष गोवळे,जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रमोद जाधव,पंचायत सदस्य श्री.नितीन म्हामुणकर,श्री.भाई मालगुणकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे मंडणगड शहर अध्यक्ष वैभव कोकाटे,श्री.सुभाष सापते,माजी नगरसेवक बांधकाम सभापती दिनेश लेंडे,माजी नगरसेवक राहूल कोकाटे,उद्योजक श्री.दिपक घोसाळकर,दिनेश उंबरे, भिंगलोळी ग्रामपंचायत माजी सरपंच श्री.राकेश साळुंखे,भ रुपेश साळुंखे,राजा लेंडे,रघुनाथ पोष्टुरे, आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.