खेड :- कोकणात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्धस्थ झाले. या पुरात अनेक जणांना आपला जिवही गमवावा लागला. यातीलच खेड बिरमनी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून जयवंत भाऊराव मोरे व ललिता जयवंत मोरे या पती पत्नीला आपला जिव गमवावा लागला. याची माहीती कळताच पुरग्रस्तांच्या मदतीला कोकणात गेले असताना त्यांनी त्यांच्या मुलाची भेट घेतली असता त्याला ‘लाखमोलाची’ मदत केली.जयवंत मोरे हे आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांच्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक होते. खेड येथील दुर्घटनेत त्यांच्या या दुर्दैवी मृत्युमुळे जोगेश्वरी विभागातील सर्व शिवसैनिकांना अतिशय दुःख झाले. या दुर्घटनेत त्यांचे बिरमनी येथील घराचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. आपल्या आई-वडीलांची आठवण म्हणुन त्यांचा मुलगा अनंत याला बिरमनी गावातील पडलेले घर पुन्हा बांधण्यासाठी सहाय्य व्हावे .यासाठी आमदार रविंद्र वायकर यांनी आज खेड येथे जाऊन त्याला रोख रक्कम रुपये एक लाखाची मदत केली. त्याबरोबरच घरातील वस्तूंची देखील नासधूस झालेल्या या कुटुंबाला इतर जीवनावश्यक वस्तूही वायकर यांनी दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.