अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महापूर आलेल्या जिल्ह्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू,10 किलो तांदूळ,5 लिटर केरोसीन,5 किलो डाळ पुरवण्याचे आदेश दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. तर, दुसरीकडे शिवभोजन थाळ्यांची संख्या दुप्पट करण्याचे आदेश दिल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. तर, पूर ग्रस्त जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि दरड कोसळल्यानं मोठा फटका बसला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*