चिपळूण:- गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. विकास शांताराम खडपेकर (४८, रा. वाघिवरे, चिपळूण) असे बडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. खडपेकर हे सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. या नदीवर खडपेकर हे सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. या घटनेनंतर नदी परिसरात त्याचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. अखेर मंगळवारी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला आहे.