रत्नागिरी– महापूर आणि नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी आणि चिपळूण बांधकाम विभागात पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेचे ६६ कोटीचे नुकसान झाले आहे. २६९ रस्ते, ८१ पूल आणि मोरी, ३७ साकव, १३ इमारती मिळून ४०० ठिकाणी नुकसान झाले. रस्त्याचे ३९ कोटी १० लाख नुकसान आहे. ७४ पाणीपुरवठा योजना आणि ३७ विहिरींचे नुकसान झाले आहे. पावसामुळे ४१ शाळा बाधित झाल्या. १९ संरक्षक भिंत, ७ शौचालये आणि ४ किचन शेड पडल्या. शासनाच्या विविध योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या १२ घरांचे ४४ लाखांचे नुकसान झाले. पुरात वाहून किंवा दरड कोसळून जनावरे मृत पावली. सुमारे १३०० जनावरांचे ४५ लाखाचे नुकसान झाले. ६८९ जनावरे मरण पावली.