रत्नागिरी:- कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनामार्फत पाच लाख रुपये, केंद्र शासनामार्फत पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन स्किम योजनेंतर्गत दहा लाख रुपये, असा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच बालकांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारा आर्थिक लाभ यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र शासनामार्फत पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन स्कीम योजनेंतर्गत देय होणारा लाभ जिल्हाधिकार्यांमार्फत नुकताच मंजूर करण्यात आला आहे. संबंधित लाभार्थी, जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पोस्ट खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.