दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीची धुमश्चक्री सुरू झाली आहे. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन अर्ज भरायचे आहेत. आज पहिल्या दिवशी एकाही उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये. त्यामुळे आज पहिल्या दिवशी नगरपंचायतीसाठी शुन्य उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
यंदाची निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. दोन्ही पक्षांकडून यंदा सत्ता आमचीच असेल असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र राहणार आहेत. तर दुसरीकडे भाजपा स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे.
दापोलीतील नागरिक कोणाला निवडून देतात हे येत्या 22 तारखेलाच स्पष्ट होईल. दरम्यान निवडणुकीची रंगत पुढच्या काही दिवसांमध्ये दापोलीकरांना अनुभवायला मिळेल.