
रत्नागिरी : शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथील कचरा संकलन केंद्राला (डेपो) गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठी आग लागली.
प्लास्टिक आणि सुक्या कचऱ्यामुळे आगीने झपाट्याने भडका उडाला, परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करून आग नियंत्रणाचे काम हाती घेतले.
अग्निशमन दलाचा बंब दाखल होताच जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.
नगरसेवक सौरभ मलुष्टे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून अग्निशमन दलाच्या कामावर देखरेख करत होते आणि प्रशासनाला आवश्यक सूचना देत होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

Leave a Reply