अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान: २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

रत्नागिरी : जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अपंग शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्ध आहे.

सन २०२४-२५ च्या या योजनेअंतर्गत, शाळांना १२ प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि शुद्ध पेयजल, इन्व्हर्टर/जनरेटर यांसारख्या आवश्यक सुविधांसाठी कमाल १० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.

पात्र शाळांमध्ये किमान ७०% अल्पसंख्याक विद्यार्थी (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी, ज्यू) असणे आवश्यक आहे.

अपंग शाळांसाठी ही अट ५०% आहे. इच्छुक शाळांनी २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत.

यासोबतच, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मदरसांनीही त्याच तारखेपर्यंत अर्ज सादर करावेत.

अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*