दापोली :- दापोली तालुक्यातील मुरुड येथे वाणिज्य वापरासाठी विनापरवाना बांधकाम करणाऱ्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील मुरुड येथे गट नं. ४४६ या मिळकतीमध्ये निम्मे क्षेत्र संदीप संभाजी सावंत यांचे मालकीचे असून त्यात पुष्कर श्रीकृष्ण मुळे यांनी २०२१ मध्ये वाणिज्य वापरासाठी तळ मजला + १ असे इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. हे बांधकाम काढून टाकण्यासाठी त्यांना उपविभागीय अधिकारी दापोली या कार्यालयातून नोटीसही पाठविण्यात आली होती मात्र सदर बांधकाम न काढल्याने पुष्कर श्रीकृष्ण मुळे यांचे विरोधात बुरोंडी येथील मंडल अधिकारी दिलीप शिगवण यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ अन्वये पुष्कर श्रीकृष्ण मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास हेड कॉनस्टेबल दीपक गोरे करत आहेत.