जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक व युद्ध विधवांचा मेळावा आयोजित

रत्नागिरी, दि. 30 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे खेड तालुक्यात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 7 मे रोजी काढसिद्धेश्वर मठ, तांबट (खोपी) येथे, 8 मे रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, आंबवली येथे आणि 9 मे रोजी शिवतेज सेवाभावी संस्था, खेड येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली.

या मेळाव्यात पेन्शन, अभिलेख कार्यालय, महासैनिक पोर्टलवर नोंदणी तसेच इतर अडचणींचे निरसन केले जाणार आहे. मेळाव्यास येताना माजी सैनिकांनी डिस्चार्ज पुस्तक, पीपीओची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ईसीएचएस कार्ड आणि आधारशी लिंक केलेला मोबाइल फोन सोबत आणणे आवश्यक आहे. माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता आणि वीर पिता यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*