माजी खासदार विनायक राऊत १० मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; तिवरे येथे मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती

चिपळूण: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत हे सोमवार, १० मार्च २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात ते तिवरे येथील स्वयंभू श्री शंकर हनुमान मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

माजी खासदार राऊत सोमवार, १० मार्च रोजी पहाटे ४ वाजता २०१११ कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईहून चिपळूण रेल्वे स्थानकात पोहोचतील. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील.

सकाळी १०.३० वाजता शासकीय विश्रामगृहातून ते तिवरे गावाकडे प्रस्थान करतील.

सकाळी ११ वाजता तिवरे येथे स्वयंभू श्री शंकर हनुमान मंदिराच्या कलशारोहण आणि उद्घाटन समारंभाला ते उपस्थित राहतील.

दुपारी ३.३० वाजता १०१०४ मांडवी एक्सप्रेसने ते चिपळूण रेल्वे स्थानकातून मुंबईकडे रवाना होतील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*