दापोली : समाजसेविका आणि दापोली नगरपंचायतीच्या माजी नगरसेवक शेहनाज शरीफ काजी यांचा कर्करोगाशी असलेला लढा अखेर संपुष्टात आला. दापोलीतील आपल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्या 58 वर्षांच्या होत्या.

मुळच्या केळशीच्या असलेल्या शेहनाज काझी यांनी समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या कायम अग्रेसर होत्या. त्यांनी दक्षता समितीच्या सदस्यपदी काम केलं आहे.

शेहनाज काझी अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाच्या होत्या. शहराच्या विकास कामात त्यांचा वाटा मोलाचा होता. त्यांच्या अचानक जाण्यानं परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पती, २ मुलगे, १ मुलगी, सुन, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.