खेड तालुक्यातील चिंचघर, (वेताळवाडी) येथे दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या संकल्पनेतून ‘श्री. भैरवनाथ’ १०० बेडचे अत्याधुनिक कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे साहेब यांच्या शुभ हस्तेआज पार पडले.

या वेळी उपस्थित चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, शास्त्रज्ञ मुंबई दिलीप पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, मा. आमदार रमेश कदम, महेश गणवे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषद नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजय बिरवटकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जयवंत जालगांवकर, राष्ट्रवादी काँग्रेस दापोली विधानसभा क्षेञाध्यक्ष मुजीब रुमाने, मनसे खेड शहर अध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, जलाल राजपूरकर, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष नंदु साळवी, ऋषिकेश कानडे, उद्योजक कय्युम नाडकर, विक्रांत पाटील, जयेश गुहागरकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिद्धी माध्यम प्रमुख किशोर साळवी ,मनविसे उप प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.