येत्या १० मार्चला देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. यामध्ये गोव्यात भाजपं सत्ता राखणार कि नाही, या चर्चांना उधाण आलंय. यंदा गोव्यात भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचाही मैदानात आहे.४० जागांसाठी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्याआधीच भाजपने देवेंद्र फडणवीस यांना गोव्याला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस यंदा गोव्याचे प्रभारी आहेत. गोव्यात भाजपला सत्ता राखण्यात कष्ट घ्यावे लागणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपला सत्ता आणण्यासाठी झगडावं लागलं होतं. यंदा मुख्यमंत्री सावंत यांना खुर्ची कायम ठेवण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागू शकते. सध्या गोव्यात त्रिशंकू सत्ता होण्याची शक्यता आहे.