दापोली – तालुक्यातील स्थानिक जेसीबी मालकांनी एकत्र येऊन ‘दापोली तालुका स्थानिक जेसीबी मालक संघटना’ची स्थापना केली आहे.
या संघटनेच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि जेसीबी मालकांचे हित जोपासले जावे, हा मुख्य हेतू आहे.

संघटनेच्या स्थापनेसाठी आयोजित बैठकीत सर्व जेसीबी मालकांनी एकत्र येऊन आपले पदाधिकारी निवडले.
यामध्ये अध्यक्षपदी उदय खटले, उपाध्यक्षपदी अनिल उर्फ अण्णाप्या माने, सचिवपदी नवीन चव्हाण आणि सदस्य म्हणून अमरेश अनिल हेडकर यांची निवड करण्यात आली.
या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या संघटनेच्या स्थापनेमुळे स्थानिक जेसीबी मालकांना एकत्रितपणे काम करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे.
तसेच, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
या उपक्रमाला उपस्थित सर्व जेसीबी मालकांनी पाठिंबा दर्शवला असून, हा उपक्रम यशस्वी झाल्यास दापोली तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.