रत्नागिरी दि.28:- राज्याचे ऊर्जा मंत्री  डॉ. नितीन राऊत गुरुवार 29 जुलै 2021 जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार 29 जुलै 2021 रोजी सकाळी 10.10 वाजता मुंबई-करमाळी तेजस एक्सप्रेसने चिपळूण रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह चिपळूणकडे प्रयाण.  सकाळी 10.30 वाजता चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.  सकाळी 11 वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची दूरदृश्य प्रणालीद्वारे (Vedio Conference) बैठक (स्थळ: उमेश सपकाळ, शहर प्रमुख चिपळूण यांचे संपर्क कार्यालय, चिपळूण जि. रत्नागिरी).  सकाळी 11.30 ते 12.30 वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या समवेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने  समितीची दूरदृश्य प्रणालीद्वारे (Vedio Conference) बैठक (स्थळ: उमेश सपकाळ, शहर प्रमुख चिपळूण यांचे संपर्क कार्यालय, चिपळूण जि. रत्नागिरी).  दुपारी 1 ते 2 वाजता राखीव. दुपारी 2 ते 2.30 वाजता खेर्डी चिपळूण येथील पुरामुळे झालेल्या विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी.  दुपारी 2.30 ते 3 वाजता वशिष्ठी नदी पुलाजवळ, चिपळूण येथील पुरामुळे झालेल्या विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी.  दुपारी 3 ते 3.30 वाजता मुरादपूर येथील 33 केव्ही उपकेंद्राजवळ पुरामुळे झालेल्या विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी.  दुपारी 3.40 वाजता पूरग्रस्त गरजवंतांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप.  सायंकाळी 4 वाजता चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.  सायंकाळी 4.30 वाजता पत्रकार परिषद (स्थळ: शासकीय विश्रामगृह चिपळूण).  सायंकाळी 5.00 वाजता चिपळूण शासकीय विश्रामगृह येथून कराड जि. साताराकडे प्रयाण. 
——-