कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण, रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण हाेणार

कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिलीकोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेड्ये, जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच इंधन खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*