निसर्ग चक्रीवादळामध्ये दापोली तालुक्यातील गव्हे येथील सचिन लिंगावळे यांच्या घराचे पत्रे उडाले होते. त्यामुळे घरात पाणी शिरून लाईटचे बोर्ड खराब झाले होते. सचिन लिंगावळे आज त्याच्या दुरूस्तीचं काम करत होते. यामध्ये त्यांना जोरदार वीजेचा धक्का बसता आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचं वय ४० असून सध्या पोलीस तपास सुरू आहे.

गेल्या आठवड्यात गिम्हवणे गावातही एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.