रत्नागिरी-रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक 5 एप्रिलला जाहीर झाली आहे.जिल्हा प्रशासनाकडून याची घोषणा करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडे दिला.त्यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे.त्यामुळे उपाध्यक्षपदाची निवडणूक जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.ही निवडणूक 5 एप्रिलला होणार असून निवडणूक अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी विकास सूर्यवंशी काम पाहणार आहेत.या पदासाठी शिवसेनेने उदय बने यांची उमेदवारी जाहीर केली असून निवड होणे ही केवळ औपचारिकता बाकी आहे.