इंदिरा वामन बडे कर्णबधिर विद्यालयाची उंबर्ले येथील सैतवडेकर बागेत शैक्षणिक सहल संपन्न

दापोली: स्नेहदीप दापोली संचालित इंदिरा वामन बडे कर्णबधिर विद्यालयाची शैक्षणिक सहल ६ मार्च २०२५ रोजी उंबर्ले येथील मंगेश सैतवडेकर यांच्या बागेत उत्साहात पार पडली.

विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या सहलीत सहभाग घेतला.

दापोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी १०:३० वाजता एसटी बसने विद्यार्थ्यांनी उंबर्लेच्या दिशेने प्रस्थान केले.

अवघ्या १५ मिनिटांत विद्यार्थी बागेत पोहोचले. तेथे त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी काजू, जाम, करवंद इत्यादी फळांची व्यवस्था करण्यात आली होती.

बागेचे व्यवस्थापक संजय मालुसरे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या मसाला वनस्पती, फळझाडे आणि भाजीपाला वनस्पतींची माहिती दिली.

तसेच, त्यांनी बागेची देखभाल आणि पाणी व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

दुपारी विद्यार्थ्यांना मंगेश सैतवडेकर यांच्या वतीने जेवण देण्यात आले.

त्यानंतर सर्वांना कुल्फीचा आस्वाद घेता आला. बागेतील स्वच्छता आणि नियोजन पाहून विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

दुपारी ३:०० वाजता सहलीचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेत परतले.

स्नेहदीप दापोली संस्थेच्या अध्यक्षा स्मिता सुर्वे, विद्यालयाचे अध्यक्ष दीपक हडिंकर, मंगेश सैतवडेकर आणि संजय मालुसरे यांनी या सहलीच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*