दापोली : तालुक्यातील नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड व विस्ताराधिकारी गोपाळ चौधरी यांनी भेट दिली.

यावेळी शाळेची तपासणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वर्गावर जाऊन तपासली. शालेय रेकॉर्ड व इतिवृत्त आढावा घेतला.

प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजना, सखी सावित्री समिती, CCTV, विद्यार्थी सुरक्षा समिती, अध्ययन निष्पत्ती, शालेय भौतिक सुविधां बाबत चा आढावा तपासणी दरम्यान घेण्यात आला.

शैक्षणिक कामकाजाबाबत शिक्षणाधिकारी यांनी समाधान व्यक्त केलं.

शालेय कामकाज अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी मार्गदर्शन व सूचना दिल्या. रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, मंगेश गोरिवले, आंजर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप गोरिवले उपस्थित होते.

शाळेच्या वतीने स्मृतिचिन्ह व “नवरत्न” स्मरणिका देऊन सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक संतोष हजारे यांनी शाळेच्या व संस्थेच्या वतीने मान्यवरांचे आभार व्यक्त केले.