दापोली: कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टा मार्फत गेल्या तीन वर्षांपासून इको-फ्रेंडली गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

यंदाही ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात होत असून, नोंदणी मोफत आहे आणि ती ऑनलाइन करावी लागेल.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि गणेशभक्तांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेच्या नियमांनुसार, बाप्पाची मूर्ती आणि सजावट दोन्ही इको-फ्रेंडली असावेत तसेच सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू केवळ भारतीय बनावटीच्या असाव्यात, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांनी दोन फोटो आणि थोडक्यात माहिती https://mahajantrust.in/ganpati-contest या लिंकवर अपलोड करावी लागेल.

स्पर्धेसाठी नोंदणी २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत करता येईल. नोंदणीनंतर तज्ञ मार्गदर्शकांकडून परीक्षण केले जाईल आणि प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच आवश्यक असल्यास उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर केले जातील, अशी माहिती संयोजक श्वेता बापट दाबके यांनी दिली.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्रीप्रीती वैद्य, संदीप गरंडे, श्रेयस जोशी, वेदांग शितूत, सुमेध करमरकर, ऋतिक यादव, डॉ. रविकांत पवार, कौस्तुभ दाबके, श्वेता दाबके, नचिकेत बेहरे, गौरी खरे, गौरी खोत आणि संपूर्ण युवा प्रेरणा कट्टा टीम कार्यरत आहे, असे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी सांगितले.