रत्नागिरी-:- नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो, त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अधिक प्रभाव असणार्‍या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश कायम आहे. नागरिक स्वतःहून पुढे आले नाहीत. तर दुसरी लाट नियंत्रणात येणे कठीण आहे. स्वॅब दिला की, अहवाल येईपर्यंत आयसोलेट होणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. सौम्य लक्षणे असलेले अनेक होम आयसोलेट होतात. परंतु निर्बंध पाळत नाहीत, फिरत राहतात. आणि संसर्ग वाढवत आहेत. यापूर्वी प्रशासनाकडून शिक्के मारणे, कारवाई करणे हे होत होतं. मात्र ही जबाबदारी फक्त आरोग्य विभाग आणि प्रशासनाचीच आहे का? नागरिकांची काही जबाबदारी नाही का?
जिल्ह्यातील बाधितांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेईना. त्यावर निर्बंध पाळले नाही तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिला. आरोग्य विभाग आणि प्रशासन आपल्या बाजूनी सर्व प्रयत्न करीत आहे असेही त्यांनी सांगितले.