देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर जोडणाऱ्या आंबा घाटात स्विफ्ट कार सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. साखरपा पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून देवरुखमधील राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले आहेत. या घटनेनंतर देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी. एस. आय. विद्या पाटील, हेमा गोतवडे, अपर्णा दुधाने, राहुल गायकवाड, वैभव कांबळे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.