दापोली : ब्रिलियंट करिअर अकॅडमी दापोली, जेसीआय, दापोली आणि रोटरी क्लब दापोली यांच्या संयुक्तविद्यमाने तालुकास्तरीय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेचं आयोजन रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता शहरातील मराठा मंदिर शाळेच्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आलं आहे.
लहानपणापासूनच चित्रकलेमध्ये विद्यार्थ्यांना रूची असते. विद्यार्थ्यांमधील या कलेला वा मिळावा या उदात्त हेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.

ही स्पर्धा चार वयोगटांमध्ये घेतली जाणार असून त्यामध्ये ३ ते ६ वयोगट ( रंगभरण), ७ ते १० वयोगट ( रंगभरण), ११ ते १६ वयोगट ( चित्र काढून रंग भरणे) आणि १७ पासून पुढे खुला गट ( चित्र काढून रंग भरणे) अशा गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी नाममात्र ₹३०/- शुल्क रुपये असून स्पर्धकांनी आपली नावे खालील दिलेल्या क्रमांकावर फोन करून नोंदवायची आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे बक्षीस देखील देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे हे दुसरे पर्व असून गतवर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे यावर्षीही देखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
प्रवेश नोंदणीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. संपर्क क्रमांक : 9604039779, 8379960423, 9420301705.