डॉ. झीशान म्हस्कर यांचे युरोलॉजीत यश, रत्नागिरीत लवकरच खाजगी प्रॅक्टिस सुरू

रत्नागिरी: रत्नागिरीतील प्रख्यात डॉ. मुनीर म्हस्कर यांचे सुपुत्र डॉ. झीशान म्हस्कर यांनी मूत्रमार्गाच्या शल्यचिकित्सेतील सर्वोच्च परीक्षा (MCh युरोलॉजी सुपर स्पेशॅलिटी) नुकतीच उत्तीर्ण केली आहे.

या परीक्षेत त्यांनी विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी त्यांनी २०२१ मध्ये एमएस जनरल सर्जरीची पदवी यशस्वीपणे संपादन केली होती. शालेय जीवनापासूनच बुद्धिमान असलेल्या डॉ. झीशान यांनी २००८ मध्ये दहावी एसएससी परीक्षेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.

डॉ. झीशान लवकरच रत्नागिरीत खाजगी प्रॅक्टिस सुरू करणार आहेत. युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट (पुरुष वंध्यत्व आणि लैंगिक आरोग्य) आणि एव्ही फिस्टुला शस्त्रक्रिया यामध्ये त्यांचे विशेष प्रावीण्य असेल. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरीतून त्यांचे कौतुक होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*