दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या एनसीसीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मानद कर्नल कमांडंट (एनसीसी) हा सन्मान बहाल केला.
दापोली येथे आयोजित विशेष समारंभात एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पेडणेकर आणि कराड येथील एनसीसी कमांडिंग ऑफिसर सत्यशील बाबर यांनी डॉ. भावे यांच्या सैनिकी गणवेशावर कर्नल कमांडंटच्या फीती लावून हा सन्मान प्रदान केला.

या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव, संचालक, अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दापोलीच्या वतीने नगराध्यक्षा सौ. कृपा घाग, कोकण कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनिल दळवी, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नीलेश शेठ, सिनेट सदस्य संदीप राजपुरे, दिनेश जैन यांनी डॉ. भावे यांचे अभिनंदन केले.
