दापोली: डॉ बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठच्या 1996-2000 बॅचचा सस्नेह मेळावा दिनांक 12 व 13 जुलै रोजी साधना एक्झिक्युटिव्ह येथे नुकताच पार पडला.

या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन लेक्चर हॉलमध्ये बसुन जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच सर्व कॅम्पस व डिपार्टमेंटमध्ये जाऊन जुन्या दिवसामध्ये रममाण झाले.

त्यानंतर प्राध्यापक वर्गासमोर स्वतःची ओळख देऊन सध्या प्रत्येकाच्या जीवनातील प्रवासाचे वर्णन केले.

बॅच मधील जयेश साळवी यांनी ढोलक व तबला, आरती भुजबळ भोसले यांनी व्हायोलिन वादन केले व सिद्धार्थ कदम यांनी गाण्यांची मैफिल जमावून सर्वांचीच दाद मिळवली.

या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, डॉ. नाईक मॅडम, डॉ. व्ही जी नाईक, डॉ झगडे, डॉ सावंत, प्रफुल्ल अहिरे, डॉ माने आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. भावे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांचीच प्रगती पाहून समाधान व्यक्त केले व आनंदी जगण्याचा कानमंत्र दिला.

सर्व उपस्थित प्राध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण होलमुखे, जीतेंद्र सोळंकी, जयेश साळवी, श्रीनिवास बोराटे, तेजस्विनी खोचरे पाटील, नितीन तांबे, समीर कदम
यांनी विशेष मेहनत घेतली.

या कार्यक्रमासाठी प्रिया नरवणकर शिरधनकर, विवेकानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.