प्रेमविवाहात असंही होऊ शकतं का? दापोलीतील धक्कादायक घटना

दापोली : मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रेमविवाह म्हणजे एकमेकांच्या पसंतीनं केलेलं लग्न. एकदा का प्रेमविवाह झाली की, त्यांचा संसार अत्यंत सुखाचा असेल अशी अनेकांची खात्री असते. पण दापोलीमध्ये एक धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. ओणीमध्ये एका तरूणानं आपल्या बयकोलाच चारित्र्याच्या संशयावरून पेटवून दिलं आहे. ती सध्या जखमी अवस्थेत रूग्णालयात उपचार घेत आहे. प्रेमविवाहात असं काही होऊ शकंत का? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

पोलीसांनी या प्रकरणी संशयीत आरोपी शितेश विश्वनाथ औणकर (वय – २६) आणि प्रतिभा विश्वनाथ औणकर  या दोघांना अटक केली आहे. १९ जुलै २०२० रोजी दुपारी ४ वा. शितेशनं आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला काडीपेटीनं पेटवून दिलं. या घटनेमध्ये विवाहितेच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर, हातावर व उजव्या पायाच्या मांडीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

या घटनेनंतर दापोलीमधून संतापाची लाट उसळत आहे. आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या दोघा आरोपींविरोधात सौ. प्रेक्षणी शितेश औणकर (वय १८) हिनं तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांनी या घटने प्रकरणी घटना स्थळी पाहणी केली आहे. या प्रकरणाचा तापस पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*