मेळघाटमध्ये वनविभाग होती अधिकारी
रत्नागिरी : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल येथे आरएफओ पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाणी यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. दीपाली चव्हाण यांचे वडील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत होते. (RFO dipali Chavan sucide)
२०११ दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातून आपलं पद्युत्तर शिक्षण पूर्ण करून दीपाली चव्हाण यांनी २०१५ महाराष्ट्र वनसेवेची उत्तीर्ण केली होती. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून दीपाली यांची ख्याती होती. अतीशय हसमुख, प्रेमळ स्वभावाच्या दीपाली चव्हाण यांनी असं पाऊल का उचलंलं असेल याची चर्चा सध्या सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचा कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रोख असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दीपाली चव्हाण यांचं दोन वर्षांपूर्वी जिल्हा कोषागार कार्यालयात कार्यरत असणाऱ्या राजेश मोहिते यांच्या सोबत विवाह झाला होता. त्या आपल्या संसारात अतिशय सुखी आणि खुश होत्या. त्यांनी अचानकपणे स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रेंजर असोसिएशन व शिवसेना नेते सुधीर सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलीस उपअधीक्षक संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी पुढील तापस करत आहेत.
२५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानातून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यावेळी आजूबाजू असलेले नागरिक, वन विभागाचे कर्मचारी त्यांच्या निवासस्थानाकडे धावले. रक्ताच्या थारोळ्यात दीपाली चव्हाण यांना पडलेलं पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दीपाली चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी त्यांना सुसाईट नोट देखील सापडल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल ९ पानांच्या या सुसाईट नोटमध्ये काय लिहिलं गेलं आहे हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाहीये.