संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. मृत्यूसमयी ते 49 वर्षाचे होते.
गेली अनेक दिवस प्रकृती अस्वस्थ असलेने त्यांचेवर कोल्हापूर येथे उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीची स्थापना करुन त्याद्वारे त्यानी कोरोनाकाळात व त्यानंतरही अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.