भारतात लवकरच भारतीय डिजिटल चलन सुरू होण्याची शक्यता आहे.याबाबत योजना आखली जात आहे.खुद्द रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीच तसे संकेत दिले आहेत.

ते म्हणाले, ‘आरबीआय स्वत:चे डिजिटल चलन सुरू करण्याच्या तयारीत आहे.हे चलन क्रिप्टोकरन्सीपेक्षा पूर्णपणे वेगळं असेल.देशात जर डिजिटल चलन सुरू झालं तर बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांवर अंकुश ठेवणं शक्य होईल. त्याचबरोबर कर्जवाटपासोबतच आर्थिक व्यवस्थाही पारदर्शक होईल.’

फॉरेन्सिक अॅडव्हायजरी डेलॉइटचे के.व्ही.कार्तिक म्हणाले,’आर्थिक घोटाळ्यांवर अंकुश लावण्यासाठी डिजिटल चलन नक्कीच फायदेशीर आहे.