रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर-देवरुख तालुक्यांचे निकाल जाहीर

रत्नागिरी : कांचन डिजिटल आणि भैय्या तथा किरण सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय भव्य “कांचन डिजिटल गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली.

स्पर्धेचे यंदा 5 वे वर्ष असल्यामुळे यंदा स्पर्धेचा इतर 4 तालुक्यांत विस्तार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण पूर्ण झाले असून रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर-देवरुख तालुक्यांचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

या स्पर्धेचे परीक्षण रत्नागिरी तालुक्यासाठी कांचन मालगुंडकर, अभिजीत नांदगावकर, नरेंद्र पाटील सर, विजय पाडावे, विजय बासुतकर, अजिंक्य सनगरे, श्रावणी मालगुंडकर, मंथन मालगुंडकर, सलोनी मालगुंडकर, शकील गवाणकर यांनी केले.

तर राजापूर तालुक्यासाठी चारुदत्त नाखरे, कलीम मुल्ला, लांजा तालुक्यासाठी अपर्णा हळदणकर व सहकारी, तसेच देवरुख-संगमेश्वर बाळकृष्ण चव्हाण व सहकाऱ्यांनी केले.

गणेशोत्सव कालावधितच त्वरित परीक्षण व निकाल हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. यंदाही स्पर्धेला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. गणेशभक्तानी अत्यंत कलात्मक, कल्पकतेने विविध देखावे, आकर्षक आरास साकारल्या होत्या.

विशेष म्हणजे यंदा अध्यात्मिक-पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांसह सामाजिक देखावे साकारण्यावर भर देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता.

“स्त्रीवरील अत्याचार, प्लास्टिक दुष्परिणाम, प्रदूषण, सरकारी शाळांचे महत्व” आदी सामाजिक विषय मांडून याबाबत समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले.

हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी यानिमित्ताने नमूद केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
रत्नागिरी तालुका निकाल-: प्रथम – आशिष वाडकर, मिरजोळे (मार्लेश्वर देखावा ), द्वितीय – चारुदत्त धालवलकर, गावखडी (स्वा. सावरकर कार्य ), तृतीय – घाटकर परिवार, पावस (वृक्षतोड दुष्परिणाम).

विशेष उल्लेखनीय – संदीप मेस्त्री, जयगड (स्त्री सन्मान), किशोर भोसले, पावस (केदारनाथ मंदिर), सुहानी गोताड, गवाणवाडी (मताधिकार ), अजय पारकर, मावळंगे (सरकारी शाळा महत्त्व ), रमेश माचकर शिरगांव (सुतारकाम), राहूल पाडावे, मिरजोळे (प्लास्टिक दुष्परिणाम ).

उत्तेजनार्थ – दीपक मेस्त्री, मिरजोळे (भक्त प्रल्हाद ), संजय वर्तक, कुवारबाव (गणेश आरास), जीवन कोळवणकर, कुवारबाव (मूषक रथ), मयुरेश भितळे, सोमेश्वर (वाढते शहरीकरण), निलेश लाड, कसोप (सीता हरण).
▫️प्रोत्साहन पर – अनंत फणसोपकर, ध्रुव भाटकर, अर्जुन माचिवले, साईराज कामतेकर, संतोष माचकर, प्रवीण घवाळी, मनोज सारंग, सागर पुसाळकर, अनिकेत सुपल.

लांजा तालुका निकाल -: प्रथम – अजय आग्रे, अगरगाव (ग्रामीण देखावा), मोहन तोडकरी, लिंगायतवाडी (वारकरी ), अवधूत कीर, आदर्श नगर (घरगुती देखावा).

राजापूर तालुका निकाल -: प्रथम – अनिल नार्वेकर, आडिवरे (दत्त अनुसूया देखावा), द्वितीय – बाणे गुरुजी, राजापूर (गणपती – कार्तिकेय देखावा), रामचंद्र पिठलेकर, राजापूर (हनुमान – श्रीराम दर्शन ). उत्तेजनार्थ – सुनील गुरव, गुरववाडी.

संगमेश्वर – देवरुख निकाल -: प्रथम – विजय तळेकर, मार्लेश्वर, द्वितीय – चंद्रकांत खाके, ताम्हाणे, तृतीय – गणेश साळवी, पाटगाव, उत्तेजनार्थ – सुनील कळंबटे, सार्थक देसाई.

रत्नागिरी तालुक्यासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, विशेष उल्लेखनीय, उत्तेजनार्थ व प्रोत्साहन पर अशी अनुक्रमे 13 हजार, 9 हजार, 6 हजार, 1500/-, 1000/- व 500/- व प्रत्येकी ट्रॉफी, प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर लांजा, राजापूर, संगमेश्वर-देवरुख तालुक्यांसाठी अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार व 500 व प्रत्येकी ट्रॉफी, प्रमाणपत्र अशी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

भव्य पारितोषिक वितरण सोहळा 21 रोजी

स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता जयेश मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे होणार आहे. यावेळी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तरी गणेशभक्तांनी ह्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक फोटोग्राफर कांचन मालगुंडकर (कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ) यांनी केले आहे.

महिलांसाठी खास “पैठणी” स्पर्धा

पारितोषिक समारंभादरम्यान “भावभक्तीचा; खेळ पैठणीचा” हा महिलांसाठी खास पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला आहे. तरी महिलावर्गाने या पैठणीच्या खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.