दापोली : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी आणि तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे आयोजित तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी दयान सहीबोले याने १७ वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. दयान हा प्रशालेत लिपिक म्हणून कार्यरत असणारे अनिस सहीबोले यांचा मुलगा आहे.
या स्पर्धेत दयानने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या या यशाबद्दल मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, स्कूल कमिटी अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. येत्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या.