रत्नागिरी : दापोली अर्बन को-ऑप. बँक लि., दापोलीच्या रत्नागिरी शाखेचे गाडीतळ येथील जागेमधून घाणेकर आळी येथील श्री दत्तसंकुल या नवीन जागेत स्थलांतर होणार आहे.
हा शुभारंभ सोमवार, दि. १४ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर असणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी म. थोरात, पालक संचालक निलेश ज. जालगांवकर, उपाध्यक्ष आशिष चं. मेहता आणि शाखाधिकारी सिद्धेश ना. राक्षीकर यांनी केली आहे.
रत्नागिरी शहरातील दापोली अर्बन को-ऑप. बँकेची शाखा आता नवीन आणि प्रशस्त जागेत ग्राहकांना सेवा देण्यास सज्ज आहे.
नवीन शाखेचे ठिकाण श्री दत्तसंकुल, ई-विंग, तळमजला, व्यापारी गाळा क्र. १५, १६, १७, घाणेकर आळी, रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी येथे आहे.
या स्थलांतरामुळे बँकेच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा आणि सोयी मिळणार असून, बँकेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
या सोहळ्याला बँकेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद उपस्थित राहणार असून, ग्राहक आणि हितचिंतकांना या शुभप्रसंगी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दापोली अर्बन को-ऑप. बँक लि. ही रत्नागिरी जिल्ह्यातील एक विश्वासार्ह आणि ग्राहककेंद्रित बँक म्हणून ओळखली जाते.नवीन शाखेच्या उद्घाटनामुळे बँकेच्या सेवांचा विस्तार आणि ग्राहकांचा विश्वास आणखी दृढ होईल, असा विश्वास बँकेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.