अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांना आज दिल्लीतील एका भरगच्च कार्यक्रमात कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका (California Public University of America) या युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ सोशल सायन्स इन को-ऑप. बॅंकिंग (D.S.Sc.) ही अत्यंत मानाची “डॉक्टरेट” पदवी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. जयवंत जालगावकर यांनी बॅंकिंग क्षेत्रात दिलेल्या भरीव कार्याची ही पोहोच पावती असल्याचं बोललं जात आहे. जयवंत जालगावकर यांचं बॅंकिंग क्षेत्रातून जोरदार अभिनंदन होत आहे. यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे असं जयवंत जालगावकर यांनी माय कोकणशी बोलताना सांगितलं.
जयवंत जालगावकर हे दापोली अर्बन बँकेचे गेल्या २६ वर्षांपासून चेअरमन आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली अर्बन बँकेनं विविध क्षेत्रातील उंच शिखरे पादाक्रांत केली आहेत. दापोली अर्बन बँकन विविध सेवांमुळे संपूर्ण राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दापोलीतील प्रत्येक नागरिकाला ही बँके आपली वाटण्यामध्ये जयवंत जालगावकर यांचा वाटा मोठा आहे.
जालगावकर जयवंत आपल्या कुशल नेतृत्व गुणांमुळे सर्व सभासदांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले आहेत. बँकेच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनी कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधा ग्राहकांना देऊ केल्या आहेत. याच सगळ्या त्यांच्या कार्याची दखल कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका याने घेत त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. दापोलीतील विविध मान्यवरांबरोबरच माय कोकणचे संपादक मुश्ताक खान यांनी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.