दापोली : दापोलीत मागील २४ तासांत तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे.

ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिलेल्या माहितीनुसार, दापोलीतील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस होते.

गेल्या वर्षी याच तारखेला कमाल तापमान ३२.९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

यावर्षीच्या तापमानात लक्षणीय वाढ दिसून येत आहे.

डॉ. बा.सा.कों.कृ.वि., दापोलीच्या कृषी विद्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी विशेषतः दुपारच्या वेळी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.