दापोली तालुका व्यापारी संघटनेतर्फे स्नेह मेळाव्याचे यशस्वी आयोजन, प्रमुख समस्यांवर चर्चा

दापोली : दापोली तालुका व्यापारी संघटनेने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात आज तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर उहापोह झाला.

या मेळाव्यास गृह, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी हजेरी लावली.

या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये दापोली अर्बन बँकेचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात यांनी स्वीकारला. या प्रसंगी बँकेने पंडाल उभारून आपल्या विविध योजना आणि सेवा-सुविधांची माहिती व्यापाऱ्यांना दिली.

मेळाव्यास उपस्थित असलेले बहुतांश व्यापारी हे दापोली अर्बन बँकेचे सभासद ग्राहक असल्याने त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी बँकेला मिळाली.

मेळाव्यास किशोर देसाई, दापोली शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदिप राजपुरे, बिपीन पाटणे, बँकेचे संचालक आणि व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद काटकर, तालुका अध्यक्ष विनोद आवळे तसेच तालुका संघटनेचे सचिव मिलिंद शेठ यांची विशेष उपस्थिती होती.

व्यापारी समुदायाच्या हितासाठी आणि त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी हा मेळावा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*