दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची रायगड जिल्ह्यामध्ये बदली झाली आहे. दापोलीतील पदभार सोडून ते रायगड जिल्ह्यामध्ये हजर झाले आहेत.
राजेंद्र पाटील यांनी दापोली मध्ये अत्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या वेळेला दापोली तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता त्याबरोबरच तोक्तेचा फटका देखील बसला होता. या कठीण प्रसंगी त्यांनी चोख कामगिरी बजावली. लोकांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल हा त्याचा प्रयत्न राहिला होता.
कोरोनाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ते संयमाने हाताळताना दिसले. गरीबांना न्याय कसा मिळेल, त्यांच्या अडचणी दूर कशा होतील यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. लॉकडाउनच्या काळात अडकलेल्या लोकांना घरी पोचवण्याचे काम सुद्धा त्यांनी केलं. अनेक गंभीर गुन्ह्यांचा उकल देखील त्यांच्या काळात झाला. नेतृत्वकुशल, मितभाषी, मृदुस्वाभावाचे राजेंद्र पाटील यांनी कमी काळात आपल्या कार्याचा उत्तम ठसा दापोलीत उमटवला.
रायगड जिल्ह्यातही राजेंद्र पाटील चांगली कामगिरी करून दाखवतील यात शंका नाही. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा!