जाणून घ्या कोण आहेत दापोलीचे नवे पोलीस निरीक्षक

रत्नागिरी – जिल्ह्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. दापोलीमध्ये नितीन ढेरे यांची बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी हे आदेश दिले आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी यांची पुन्हा शहर पोलीस ठाणे, तर रविंद्र शिंदे यांची चिपळूण येथे बदली करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात देवरुखचे निरीक्षक मारुती जगताप यांची नियुक्ती केली आहे.

राज्य आणि विभाग स्तरावरील पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी, रायगड येथील तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. नवे पोलीस अधिकारी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जिल्हाअंतर्गत या बदल्या करण्यात आल्या आहेत.

शहर पोलीस निरीक्षक म्हणून विनित चौधरी, ग्रामीण पोलीस निरीक्षक म्हणून मारूती जगताप, चिपळूण रविंद्र शिंदे, दापोली नितीन ढेरे, जयगड सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, देवरूखला बाळकृष्ण जाधव, लांजा दादासाहेब घुटुकडे, दाभोळला पुजा हिरेमठ, गुहागर श्री. जाधव, तर गुहगारचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडगे यांची बदली नियंत्रणक कक्षात करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. गर्ग यांनी दिले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*