दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; 28 मे 2025 रोजी प्रत्यक्ष निवडणूक

रत्नागिरी: दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, २८ मे रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
निवडणूक कार्यक्रमातील महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे:

  • नामनिर्देशन पत्र सादर करणे: 22 मे 2025 (गुरुवार), सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत
  • नामनिर्देशन पत्रांची छाननी: 22 मे 2025 (गुरुवार), दुपारी 2.00 वाजता
  • नामनिर्देशन नाकारलेल्या उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर लावणे: 22 मे 2025 (गुरुवार), सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत
  • नामनिर्देशन फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांसाठी अपील मुदत: 26 मे 2025 (सोमवार), सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत
  • वैधरित्या नामनिर्देशन सादर केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करणे: 26 मे 2025 (सोमवार), सायंकाळी 5.00 नंतर
  • उमेदवारी अर्ज मागे घेणे: 27 मे 2025 (मंगळवार), दुपारी 4.00 वाजेपर्यंत
  • प्रत्यक्ष निवडणूक: 28 मे 2025 (बुधवार), सकाळी 11.00 वाजता
  • आवश्यक असल्यास मतदान व निकाल घोषित करणे: 28 मे 2025 (बुधवार), सकाळी 11.00 वाजता

दापोली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*