भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग, मनसेला झटका

दापोली : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दापोली तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई येथील रायगड निवासस्थानी हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष व ओम शिवभक्त मंडळ दापोलीचे अध्यक्ष राकेश माळी, रोहित शिंदे, संतू जैन, सागर तेली, पारस गुर्जर, ओंकार जैन, गजेंद्र माळी, प्रकाश तेली, कन्हैयालाल सुतार, ऋषभ कांबळे, किरण बामणे, रोहन विचारे, कुणाल जाधव, समीर कदम, रिंकू जयस्वाल, महेश बालगुडे, पृथ्वीराज शिंदे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अक्षय फाटक, प्रदेश कार्यकारणी सदस्य रुपेश बेलोसे, तालुकाध्यक्ष संजय सावंत, कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वरूप महाजन, शहराध्यक्ष संदीप केळकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*