रत्नागिरी – दापोली समुद्र किनारी सापडलेल्या चरस या अंमली पदार्थाच्या बॅगांचा विषयी आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थांच्या तस्करीचा विषय आहे.

या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून बॅगांवर पाकिस्तान, अफगानिस्थानची नावे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा तपास व्हावा, म्हणून जिल्हा पोलीस दलाकडून सीबीआय मार्फत इंटरपोलला माहिती देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी पत्रकारांशी बोलताना दिली.

Dapoli Drugs news

दापोली समुद्र किनाऱ्यावर १४ ऑगस्टच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात चरस या अंमली पदार्थांच्या बॅगा सापडल्या. यामुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली.

पोलीसांनी किनाऱ्यावर सर्च ऑपरेशन करून आतापर्यंत २५० किलो चरसच्या बॅका जप्त करण्यात आल्या आहेत. याचे बाजारभाव मुल्य सुमारे १० कोटीच्यावर वर आहे.

तसचे कस्टम विभागालाही मोठ्या प्रमाणात चरसच्या बॅगा सापडल्या आहेत. कस्टम विभागालाही मोठ्या प्रमाणात चरस सापडला आहे.

याबाबत गुजरात एटीएसची संपर्क साधला असता गुजरातमध्येही अशा प्रकारच्या चरस बॅगा सापडल्या. रायगड जिल्ह्यातही अशा प्रकारच्या बॅगा सपडल्या आहेत.

या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचा हा प्रकार असल्याने देशपातळीवर त्याचा तपास होणे आवश्यक आहे. याचा सारासार विचार करून जिल्हा पोलिस दलाने इंटरपोल मार्फत तपास व्हावा, यादृष्टीने पोलीसांच्या हालचाली सुरू आहेत.

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, आम्ही किनारपट्टीचा भाग पिंजुन काढला. सर्व स्थानिक नागरिकांना याबाबत अवगत केले आहे. त्यांच्याकडुन आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे.

दापोली किनाऱ्यावर सापडलेल्या या बॅगांवर पाकिस्तान, अफगानिस्थान असे लिहिलेले आहे. त्यामुळे हा आंतराष्ट्रीय विषय असल्याने त्या स्तरावर या चरस प्रकरणाचा तपास व्हावा, म्हणून इंटरपोलने तपास करावा, असा प्रस्ताव देणार आहे.