दापोली शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या लगत असणाऱ्या भुमिअभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा मार्च महिन्या पासून 16 हजार रु. विज बिल थकल्याने आज महावितरणने गुरुवारी सकाळीच खंडित केला. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून व खेडेगावातून आलेल्या नागरिकांची व ग्रामस्थांची नकाशे न उपलब्ध झाल्याने मोठी गैरसोय पाहायला मिळाली.

अखेर दुपारनंतर भूमिअभिलेख कार्यालयाकडून 9 हजार 140 रुपयांचा विज बिल भरणा करण्यात आल्यानंतर सदर कार्यालयाचा वीजपुरवठा सायंकाळी उशिराने पूर्ववत करण्यात आला. मात्र यामुळे अनेकांचे अतोनात हाल झाले.