दापोली : शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी.हायस्कूल येथे नुकताच शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार संस्थेच्या संचालिका स्मिता सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक एस.डी. माळी, जी.के. पांगारकर, वरिष्ठ लिपिक एन.सी. पेडणेकर यांचाही शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर तसेच संचालिका स्मिता सुर्वे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर यांचा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या संचालक पदी निवड झाल्याने त्यांचा व सौ. कालेकर यांचाही संस्था व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी सत्कारमूर्ती माळी, पांगारकर, पेडणेकर यांनी शाळेच्या व संस्थेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता आपल्या मनोगतामधून व्यक्त केली.
तसेच यावेळी शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर यांनीही सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्व शिक्षकवृंदाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच शिक्षक वृंदांनी सुद्धा वाचन संस्कृती जोपासावी व नवनवीन ज्ञान आत्मसात करावा व या नविन ज्ञानाचा उपयोग भारताची भावी पिढी सुसंस्कारित घडवण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले.
विद्यार्थी व शिक्षक बंधूंनी आपल्या शाळेचे व संस्थेचे नावलौकिक कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी अभ्यंकर एम .पी., पास्ते ए.आर. यांनी सत्कारमूर्ती बद्दल आलेले अनुभव सांगितले. तसेच सर्व सत्कारमूर्तींना विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश जोशी यांनीही शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सदस्य मोहन जाधव यांनी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या संचालपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र कालेकर यांना शुभेच्छा देऊन त्यांनी आजपर्यंत ग्रंथालय चळवळीमध्ये केलेल्या कार्याचा आढावा उपस्थिताना सांगितला.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्मिता सुर्वे यांनी सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा देऊन यापुढेही संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी सर्व शिक्षक वृंदावनवर असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओजस तेरीदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश आठल्ये यांनी केले तर आभार एस .व्ही. सपकाळ यांनी मानले.
यावेळी संस्थेचे संचालक मोहन जाधव, मोहन शिगवण तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस. एम. कांबळे, पर्यवेक्षक डी. एम. खटावकर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.